नवी दिल्ली : देशातील सर्व सिनेमागृहांत सिनेमा सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीत लावण्यात यावे, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तसेच राष्ट्रगीत सुरू असताना सिनेमागृहांत पडद्यावर राष्ट्रध्वजाचे छायाचित्रही दाखवावे, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. 


तसेच राष्ट्रगीत सुरू झाल्यानंतर सिनेमागृहांतील प्रत्येकाने राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ उभे राहिलेच पाहिजे, असेही न्यायालयाकडून सांगण्यात आले. 



केंद्र सरकारकडून लवकरच यासंबंधीच्या आदेशांची प्रत सर्व राज्यांना पाठविली जाणार आहे.