म्हणून जयललिता यांना देव मानतात लोकं
७५ दिवस संघर्ष केल्यानंतर वयाच्या ६८ व्या वर्षी जयललिता यांचं निधन झालं. त्या ६ वेळा तामिळनाडूच्या मुख्यमंत्री होत्या. २२ सप्टेंबरला जयललिता यांना अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. सोमवारी रात्री ११.३० मिनिटांनी त्यांनी शेवटचा श्वास घेतला.
चेन्नई : ७५ दिवस संघर्ष केल्यानंतर वयाच्या ६८ व्या वर्षी जयललिता यांचं निधन झालं. त्या ६ वेळा तामिळनाडूच्या मुख्यमंत्री होत्या. २२ सप्टेंबरला जयललिता यांना अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. सोमवारी रात्री ११.३० मिनिटांनी त्यांनी शेवटचा श्वास घेतला.
तामिळनाडूची जनता त्यांना देवाप्रमाणे मानायचे. त्यांनी गरिबांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले त्यामुळे त्यांना अम्मा म्हणून ओळखलं जावू लागलं. अधिक संपत्तीच्या प्रकरणात जेव्हा त्यांना जेलमध्ये जावं लागलं होतं तेव्हा देखील त्यांच्या चाहत्यांनी त्यांचं जोरदार समर्थन केलं होतं.
तमिळनाडूच्या मुख्यमंत्री असतांना जयललिता यांनी कमी किंमतीत 'अम्मा' या नावाने अनेक योजना चालवल्या. ज्यानंतर संर्पूण देशात चर्चेचा विषय बनली. त्यांनी जनतेसाठी सिनेमागृह देखील कमी तिकीटात सुरु केले. त्या म्हणायच्या की गरीबांना त्यांच्या हक्काचं असलेलं सर्व काही मिळालं पाहिजे. जयललिता यांनी सुरु केलेल्या अनेक अशा योजनांमुळे भावनात्मकरित्या लोकं त्यांच्याशी जोडले गेले.
३५ व्या वयात जयललिता या राजकारणात आल्या. ६ वेळा त्या मुख्यमंत्री झाल्या. १९८२ मध्ये जयललिता यांनी एआयएडीएमके पक्ष ज्वॉईन केला होता. एमजीआर यांनी त्यांना राजकारणात आणलं होतं.
१९८३ मध्ये त्यांना पक्षाचं सचिव बनवण्यात आलं. तसेच पक्षाच्या कॅम्पेंनची जबाबदारी देखील त्यांना देण्यात आली. १९८४ ते १९८९ पर्यंत त्या तामिळनाडूमधून राज्यसभेवर निवडून गेल्या. १९९१ मध्ये काँग्रेससोबत त्यांनी निवडणूक लढवली आणि जयललिता यांच्या पक्षाला बहुमत मिळालं आणि पहिल्यांदा त्या मुख्यमंत्री बनल्या. २००१ मध्ये पुन्हा त्या मुख्यमंत्री बनल्या. पण सुप्रीम कोर्टाने त्यांची नियुक्ति अवैध घोषित केल्याने पन्नीसेल्वम यांना मुख्यमंत्री बनवण्यात आलं.
मद्रास हायकोर्टातून दिलासा मिळाल्यानंतर २००२ मध्ये त्या पुन्हा मुख्यमंत्री बनल्या. २०११ मध्ये त्या चौथ्यांदा मुख्यमंत्री बनल्या. २०१४ मध्ये अधिक संपत्तीमुळे त्यांना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं. २०१५ मध्ये पुन्हा आरोपमुक्त होऊन त्या मुख्यमंत्री झाल्या. मे २०१६ मध्ये पुन्हा सहाव्यांदा त्या मुख्यमंत्री झाल्या.