नवी दिल्ली : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आहे. ही भेट नेमकी कशासाठी होती, याचे कारण समजू शकलेले नाही. दरम्यान, मराठा आरक्षणाबाबत चर्चा झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधानांच्या निवासस्थानी पवार यांनी ही भेट घेतल्याचे सांगण्यात येत आहे. या भेटीबाबत राजकीय वर्तुळात मोठी चर्चा आहे. महाराष्ट्र राज्यातील सध्याचे तणाव वातावरण पाहता मोदी आणि पवारांची ही भेट महत्त्वपूर्ण मानली जाते आहे.


मराठा समाजाचे मोर्चे, या समाजातील असंतोष आणि त्याचे निवडणुकीतील परिणाम या सगळ्याचा विचार करुन ही भेट झाल्याचे समजते आहे.