नवी दिल्ली : काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांनी देशद्रोहाचे आरोप असलेल्या JNUSU चा अध्यक्ष कन्हैया कुमार याची तुलना शहीद भगत सिंग यांच्याशी केली आहे. थरुर यांच्या या वक्तव्यानं नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भगत सिंग हे त्यावेळचे कन्हैय्या कुमार होते, कारण त्यांच्याविरोधातही राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. असं शशी थरुर म्हणाले आहेत. 


जेएनयूमध्ये आपल्या भाषणादरम्यान भारत माता की जय न बोलण्याबद्दल ओवेसीची पाठराखण केली. लोकशाहीत प्रत्येकाला आपल्या पद्धतीनं व्यक्त होण्याचं स्वातंत्र असतं आणि भारत माता की जय म्हंटल्यानंच देशभक्ती सिद्ध होत नाही असंही त्यांनी म्हंटलय.