चेन्नई : एकीकडे उत्तर प्रदेशात सत्ताधारी पक्षात संघर्ष चिघळला असतानाच तामीळनाडूमध्येही सत्तासंघर्षाची नांदी झालीये. लोकसभेचे उपसभापती आणि AIADMKचे ज्येष्ठ नेते एम तंबीदुराई यांनी व्ही.के. शशिकला यांनीच मुख्यमंत्री व्हावं, अशी मागणी पुढे रेटलीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या शशिकला पक्षाच्या महासचिव तर ओ. पनीरसेल्वम मुख्यमंत्री आहेत. मात्र दोन्ही पदं भिन्न व्यक्तींकडे असल्यास काय होऊ शकतं याचं समाजवादी पार्टी ताजं उदाहरण असल्याचं तंबीदुराई यांचं म्हणणं आहे. पक्षाच्या दिवंगत सर्वेसर्वा जयललिता यांच्यानंतर प्रथमच पक्षात ही दोन्ही पदं भिन्न व्यक्तींकडे सोपवण्यात आलीयेत.