मुंबई : शिवसेनेने गोरखपूरचे खासदार योगी आदित्यनाथ आणि उत्तर प्रदेशचे होणारे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना एक सल्ला दिला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे की, 'माझ्याकडे या गोष्टीवर टीका करण्यासारखं काही नाही. कारण नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील भाजप सरकार त्यांच्या इच्छेनुसार कोणालाही मुख्यमंत्री बनवू शकतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेहमी वादात्मक विधानामुळे चर्चेत असणारे खासदार उत्तरप्रदेशला सांभाळू शकतील का या प्रश्नावर उत्तर देतांना राऊत यांनी म्हटलं की, चांगलं होईल जर आदित्यनाथ वाद उभं करणारे वक्तव्य टाळतील यामुळे राज्यात अराजकता वाढेल.


राऊत यांनी म्हटलं की, 'त्यांचा वादात्मक विधान आता काम नाही करणार कारण ते आता भारतातील सर्वात मोठ्या राज्याचे मुख्यमंत्री बनणार आहेत. अशा प्रकारे जर वक्तव्य करतील तर संपूर्ण राज्याचं वातावरण बिघडेल. आता त्यांना विकासाच्या गोष्टी बोलल्या पाहिजे.'


अयोध्यामध्ये राम मंदिर बनवण्याच्या आश्वासनावर राऊत बोलले की, आता जर योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री बनल्यानंतर ही राम मंदिर नाही बनू शकलं तर ते परत कधीच बनू नाही शकणार. शनिवारी भाजपने गोरखपूरचे खासदार योगी आदित्यनाथ यांना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून नियुक्त केलं आहे. केशव प्रसाद मौर्य आणि दिनेश शर्मा हे दोन्ही उपमुख्यमंत्री असतील.