नवी दिल्ली : नोटाबंदीच्या निर्णयावरून मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडणाऱ्या शिवसेनेने तलावर मान्य केली. दरम्यान, शिवसेनेला मोदींनी विचारलं, वर जाऊन बाळासाहेबांनी विचारलं, काय काम केलंत तर तुम्ही काय उत्तर द्याल?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेना खासदारांच्या शिष्टमंडळानं आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. पण जिल्हा बँकांवरचे निर्बंध उठवण्याबद्दल कुठलही ठोस आश्वासन त्यांना मिळालं नाही. उलट मोदींनी शिवसेनेच्या खासदारांना बाळासाहेबांची आठवण करून दिली. वर जाऊन बाळासाहेबांनी विचारलं, काय काम केलंत तर तुम्ही काय उत्तर द्याल हे माहीत नाही. पण मी चांगलं काम करून आलो असं सांगू शकेन, असं मोदींनी म्हटले आहे.


नोटाबंदीचा निर्णय कुठल्याही परिस्थितीत मागे घेणार नाही असं मोदींनी शिवसेना खासदारांना स्पष्ट केलंय. तुमची आंदोलनं आधी मागे घ्या. मी रिझर्व्ह बँकेशी बोलून जिल्हा बँकांना सामवून घेण्यासाठी काय करता येईल याची चर्चा करतो असंही मोदींनी शिवसेना खासदारांना सांगितले. 


दरम्यान मोदींशी चर्चा केल्यावर उद्या होणाऱ्या विरोधकांच्या धऱणे आंदोलनात शिवसेना सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.