पणजी : गोव्यात भाजपला शह देण्यासाठी शिवसेना निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार आहे. गोव्यात 20 जागा लढविण्याचा निर्धार शिवसेनेने केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुभाष वेलिंगकर यांनी संघाचे गोवा प्रमुखपद सोडल्यानंतर संघाला अडचणीत आणले आहे. त्यांनी गोव्यात निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची भाषा केली आहे. राज्य भाषेच्या मुद्द्यावरुन ते संघातून बाहेर पडलेत. भाषा अस्मिता ही आमच्या भूमिकेशी सुसंगत आहे. 


वेलिंगकर यांच्याशी युती करताना जागा लढवताना शिवसेनेने तडजोड करण्याची तयारी दाखवली. त्यानंतर शिवसेनेने 20 जाग लढण्याचा निर्णय घेतला, असल्याची माहिती शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली.


गोव्यातले सरकार बदलणे हे उदिष्ट शिवसेनेने ठेवले आहे. गोवा विधानसभेत आता शिवसेनेचे मंत्री, असतील, असा विश्वास संजत राऊत यांनी व्यक्त केला.


दरम्यान, सलमान खान प्रकरणी शिवसेनेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सलीम खान यांनी आपला मुलगा सलमान खानला घरात कोंडून ठेवले पाहिजे, अशी बोचरी टीका केली.


सामनात प्रसिद्ध झालेल्या कार्टून प्रकरणी व्यंगचित्रकारने दिलगीरी व्यक्त केली आहे. आम्ही अनेकदा खेद व्यक्त केलाय. मराठा समाजतील प्रतिनिधिंशि बोलण्याची आमची तयारी, असे संजय राऊत म्हणालेत.