मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नोटबंदीच्या मुद्यावर शिवसेनेनं आक्रमक पवित्रा घेतला आहे. वेळ आली तर सरकारमधून बाहेर पडावं लागेल असा इशाराच शिवसेनेचे लोकसभेतले गटनेते खासदार आनंदराव अडसूळ यांनी दिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सहकारी बँका बंद करायचा रिझर्व बँकेचा डाव असल्याचा आरोपही आनंदराव अडसूळ यांनी यावेळी केला. जिल्हा अर्बन आणि सहकारी बँकांमधलपा पैसा रिजर्व बँकेनं स्वीकारावा. याबाबत 2-3 दिवसांत निर्णय झाला नाही तर सहकारी बँकांद्वारे आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला.


याबाबत झी 24 तासचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांनी खासदार आनंदराव अडसुळ यांना थेट विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना, अडसुळ यांनी वेळ पडल्यास सरकारमधून बाहेर पडण्याचा इशारा दिला.