बंगळुरु : 'बर्थ डे'ला गिफ्ट देण्याची प्रथा आहे. मात्र, 'बर्थ डे'च्या नावाखाली 'सेक्स'ची धक्कादायक मागणी चक्क एका कंपनी संचालकाने केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पिडीत महिला ही एका हेल्थकेअर कंपनीची सीईओ आहे. या कंपनीच्या एमडीने आपल्या वाढदिवासानिमित्त चक्क पिडीत महिलेकडे सेक्स करण्याची मागणी केली.  
 
पिडीत महिलेने तक्रार करताना म्हटले आहे, बर्थ डे गिफ्ट म्हणून संपूर्ण दिवस रुममध्ये घालवण्याचा प्रस्ताव या एमडीने माझ्यासमोर ठेवला. त्याने मला विवस्त्र करण्याची धमकीही दिली. तसेच कार्यालय आणि लिफ्टमध्ये मला अत्यंत वाईट वागणूक दिली. तिने आरोपी विरोधात बोमानाहाली पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. 


मी कामावर रुजू झाल्यापासून लैंगिक सुखासाठी एमडीने माझा छळ चालवला होता, असे तिने तक्रारीत म्हटले आहे. तसेच त्याने मला अनेकदा अयोग्य पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. ज्यावर मी आक्षेप घेतला, असे तिने यात म्हटले आहे. 


२१ जुलैला बर्थ डे गिफ्ट म्हणून एमडीने आपल्याला त्याच्यासोबत वेळ घालवण्यासाठी बोलावले. आपण जर प्रस्ताव धुडकावला तर, कंपनीच्या नफ्यामध्ये हिस्सा देणार नाही, असे आपल्याला सांगितल्याचे पीडित महिलेने तक्रारीत म्हटले आहे.