नवी दिल्ली : राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांची 1960 च्या दशकातली लव्ह स्टोरी लवकरच शॉर्ट फिल्मच्या रूपानं प्रेक्षकांसमोर येणार आहे. इजाजत नावाच्या शॉर्टफिल्ममध्ये प्रेक्षकांना पाहता येणार आहे. इंग्रजी आणि इटालियन भाषेतली ही फिल्म युट्युबवरून प्रदर्शित होणार आहे. टीव्ही कलाकार करणवीर बोहरा हे राजीव गांधींची तर प्रिया बॅनर्जी सोनिया गांधींची भूमिका साकारणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या शॉर्टफिल्ममध्ये कोणताही राजकीय मुद्दा असणार नाही असा दावा निर्मात्यांनी केलाय. पण गांधी घराण्याशी संबंधित असल्यानं या शॉर्टफिल्मवरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. राजीव आणि सोनिया गांधींबाबत काहीही चुकीचे संदर्भ फिल्ममध्ये दाखवू नयेत, अशी अपेक्षा काँग्रेसकडून व्यक्त केली जात आहे.


राजीव गांधी आणि सोनिया गांधींच्या लव्ह स्टोरीचा पहिला चॅप्टर सुरू झाला तो केंब्रिज युनिवर्सिटीत. राजीव गांधी इंजिनिअरींगचं शिक्षण घेत होते. तिथल्या एका पॉप्युलर रेस्टॉरंटमध्ये त्यांनी पहिल्यांदा सोनियांना पाहिलं आणि पाहताक्षणी दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले.


दोघांचे केवळ देशच नाही, तर भाषा आणि संस्कृतीही निरनिराळी होती. राजीव गांधी भारताच्या शक्तिशाली राजकीय घराण्याशी संबंधित, तर सोनिया मायनो या इटलीच्या सैनिक घराण्यातल्या. इंग्रजी शिक्षण घेऊन फ्लाइट अटेंडंट होण्याची सोनियांची इच्छा होती. अर्थातच त्यांच्या लग्नात असंख्य विघ्नं आली. अखेर 1968 मध्ये इंदिरा गांधींच्या उपस्थितीत एका साध्या समारंभात दोघांचा विवाह संपन्न झाला.