राजकोट :  येथील एका हॉस्पिटलमध्ये एका महिलेने दोन हृदय, दोन डोळे, चार कान चार हात आणि चार पायांच्या मुलांना जन्म दिला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जन्म झाल्यावर या मुलाचा मृत्यू झाला.  वैद्यकीय भाषेत याला डाइसिफेलिक पैरापेगस आणि अशा मुलांना सयामी बेबी किंवा कन्जॉइन्ड ट्विन्स म्हणतात. 


१ लाख प्रेग्नेंन्सीमध्ये एका मुलाचा जन्म होतो, असे डॉक्टरांनी सांगितले. 


कसे जन्मतात सयामी


डॉक्टरांनी सांगितले की, गर्भात जुळी मुलं असतील तर गर्भधारणेनंतर दोन तीन दिवसात गर्भाचे पार्टिशन होते. 


- या प्रकारात दोन आठवडे झाले तरी गर्भ विभाजनाची प्रक्रिया होत नाही. 


- ही प्रक्रिया खूप लांबली त्यामुळे दोन्ही मुलांचे शरीर आपसात जुळले. 


- सयामी मुलांचे शरीर सर्जरीने वेगळे करता येतात. ही सर्जरी खूप महाग असते. 


- सामान्यता सर्जरी यशस्वी होण्यात अडचणी येतात. खूप कमी सर्जरी यशस्वी होतात. 


मुलांबद्दल काय बोलले डॉक्टर 


- डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार मुलांचे मेंदू आणि छातीचा भाग जोडला गेला होता. 
- दोन डोळे, चार कान, चार हात आणि चार पायांचा मुलगा प्रिमॅच्युर बेबी होता. 
- सोनोग्राफीमध्ये मुलं सयामी असल्याचे समजले होते. 
- याची माहिती परिवाराला पहिल्यापासून होती. आईच्या जिवाला धोका होता, त्यामुळे नॉर्मल डिलिवरी शक्य नव्हती म्हणून ऑपरेशन करण्यात आला. 


का होते असे... 


- जेव्हा बिजांड दोन भागत वेगळं होऊन एकसारखेच ट्विन्स निर्माण करतात. असे गर्भधारणेनंतर आठ ते १२ आठवड्यात होते. जर हा काळ १३ ते १५ आठवड्यांचा झाला तर ते एकमेकांपासून वेगळे होऊ शकत नाही. मग त्याचे अशातच अंग निर्माण होतात.