नवी दिल्ली : एअर इंडीयाच्या विमानांमध्ये पहिल्यांदाच सहा जागा महिलांसाठी राखीव असणार आहेत. पुढच्या आठवड्यापासून देशांतर्गंत उड्डाणासाठी महिलांसाठी राखीव जागा असणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकटी महिला प्रवासी असेल तर मधली किंवा विन्डो सीट दिली जाते. मात्र महिलांसाठी ती सीट गैरसोयीची असते. विशेष करुन वॉशरुमला जाताना ही सीट अडचणीची असल्याची तक्रार होती. आता आरक्षित सहा सीट्स तिस-या रांगेत इकॉनॉमी  क्लासमध्ये असणार आहेत. मात्र जेव्हा एखादी महिला कुटुंबासोबत असल्यास या सिटचा लाभ मिळणार नाही.