नवी दिल्ली : व्यक्तिमत्त्व प्रभावी नसल्याने 'जेट'ने नोकरी नाकारली होती, असं  वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी सांगितलं.मात्र जेट एअरवेजने आपल्याला न दिलेल्या नोकरीबद्दल वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी जेट विमान कंपनीचे आभार ही व्यक्त केले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका सोहळ्यात जेट एअरवेजच्या एका पदाधिकाऱ्याला इराणींच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या.


काही दिवसांपूर्वी मंत्रिमंडळात झालेल्या बदलानंतर मनुष्यबळ विकास मंत्रिपदी असलेल्या स्मृती इराणींना वस्त्रोद्योग मंत्रालय देण्यात आलं.


स्मृती इराणी म्हणाल्या, जेटमध्ये नोकरी मी अर्ज केलेली पहिली नोकरी होती. माझा अर्ज जेट एअरवेज कंपनीने नाकारला होता. माझं व्यक्तिमत्त्व प्रभावी नसल्यामुळे कंपनीतील निवड अधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला, असं त्या दिल्लीतील एका पुरस्कार सोहळ्यात म्हणाल्या. 


केबिन क्रू या पदासाठी स्मृती यांनी केलेला अर्ज जेट एअरवेजने फेटाळला होता.