स्नॅपडीलची महिला कर्मचारी अचानक गायब!
ई कॉमर्स वेबसाईट `स्नॅपडील`मध्ये काम करणारी एक तरुणी अचानक गायब झाल्यानं खळबळ उडालीय.
नवी दिल्ली : ई कॉमर्स वेबसाईट 'स्नॅपडील'मध्ये काम करणारी एक तरुणी अचानक गायब झाल्यानं खळबळ उडालीय.
काम संपल्यानंतर ऑफिसवरून घरी निघालेली दीप्ती सारना ही महिला कर्मचारी घरी पोहचलेलीच नाही. उल्लेखनीय म्हणजे, या बातमीवर कंपनीचा संस्थापक कुणाल बेहल यानंही सोशल माडियावर शिक्कामोर्ब केलंय.
गुरगाव स्थित ऑफिसमधून बाहेर पडल्यानंतर घरी जाण्यासाठी दीप्ती नेहमी मेट्रोने गाझियाबाद आणि तिथून ऑटो घेऊन आपल्या घरी पोहचत असे. बुधवारी सायंकाळीही ती ऑफिसमधून निघाली मात्र घरी पोहचलेली नाही.
कुणाल बेहल यांनी आपली चिंता व्यक्त करत कंपनी पोलिसांना पूर्ण सहकार्य करत असल्याचं म्हटलंय.