कुपवाडा: लान्स नायक पांडूरंग महादेव गावडे यांना आज वीर मरण आलं. जम्मू-काश्मीरमध्ये काल झालेल्या दहशतवाद्यांच्या चकमकीत महाराष्ट्राचा पांडूरंग गावडे जवान जखमी झाला. गावडेंच्या तुकडीने पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. शनिवारी कुपवाडीत काही दहशतवादी लपून बसल्याची खबर मिळाली. माहितीच्या आधारे लष्कारानं संशयित जागा घेरली व पाच दहशतवाद्यांना मारण्यात गावडेंच्या तुकडीला यश आले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चकमकीदरम्यान गावडे जखमी झाले. त्यांना त्वरीत रुग्णालयात नेण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. 


पाडूंरंग गावडे मुळचे सिंधूदुर्ग जिल्ह्यातल्या आंबोलीचे जवान होते.  ते 34 वर्षाचे होते. गेल्या पंधरा वर्षांपासून ते लष्कराच्या सेवेत होते. त्यांच्या मागे त्यांची तीस वर्षांची पत्नी आणि दोन मुलं असा परिवार आहे.