नवी दिल्ली : सध्या तुम्हाला पॅनकार्ड काढायचे असल्यास २-३ आठवड्यांचा कालावधी लागतो. मात्र लवकरच तुम्ही ५-६ मिनिटांत पॅनकार्ड काढू शकणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डा(सीबीडीटी)ने यादिशेने पावले उचलण्यास सुरुवात केलीये. ई-केवायसीच्या माध्यमातून संबंधित व्यक्तीचा पत्ता आणि वैयक्तिक माहितीची खातरजमा केली जाणार आहे. 


याशिवा. सीबीडीटी करदात्यांसाठी आणखी एक नवे पाऊल उचलतेय. लवकरच करदाते आपल्या स्मार्टफोनद्वारे इनकम टॅक्स भरु शकतात. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार जर केवायसीच्या माध्यमातून सिम कार्ड दिले जाऊ शकते तर पॅनकार्डही दिले जाऊ शकते. 


यामुळे ज्या पॅनकार्डसाठी २-३ आठवडे लागतात ती प्रक्रिया ५-६ मिनिटांत होऊ शकते. दरम्यान, यामुळे पॅननंबर जरी तात्काळ मिळत असला तरी प्रत्यक्षात पॅनकार्ड हातात येण्यास काही कालावधी लागेल असेही या अधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले. 


तसेच अॅपद्वारे इनकम टॅक्स भरण्याच्या प्रक्रियेबाबतही हालचाली सुरु आहेत. या अॅपमध्ये पॅनसाठी अर्ज करणे, टॅक्स रिटर्न भरण्याबाबतची सर्व कामे होऊ शकतील.