नवी दिल्ली :  अडअडचणीला पीएफमधून पैसे काढण्याची तरतूद आहे. लग्न, घर खरेदी आणि असेच काही प्रसंगी काही टक्के पैस काढता येतात, आता घराचे हप्ते भरण्यासाठी आणि घर खरेदीचे डाऊन पेमेंट भरण्यासाठी ९० टक्के रक्कम काढता येणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निवृत्त झाल्यानंतर पैसा कामाला येऊ शकतो, असा आपल्या पगारातील भाग संस्था वजा करून पीएफमध्ये टाकते. आता असे पीएफचे पैसे भरणाऱ्यासाठी येत्या काही दिवसात खुशखबर मिळण्याची शक्यता आहे. 


याबाबतच्या कायद्यात दुरूस्ती सुचवणारं विधेयक या अधिवेशनात सरकार मांडणार आहे. घर घेताना डाऊन पेमेंट देण्यासाठी पीएफमधून 90 टक्क्यांपर्यंत पैसे काढता येणार आहेत.याचा चार कोटी लोकांना फायदा होईल.