मुंबई : नविन वर्षाच्या सुरूवातीला स्टेट बँक ऑफ इंडियाने स्वस्त कर्जाची भेट दिली आहे. एसबीआयचे कर्ज स्वस्त होणार आहे.


एसबीआयनं लँडिंग रेट 0.90 टक्क्यांनी घटवलंय. नोटाबंदीनंतर बँकांमध्ये आलेल्या पैश्यानंतर हा निर्णय घेतल्याचं बोललं जातंय.  या एसबीआयच्या निर्णयानंतर दुस-या बँकेचं रेटही कमी होण्याची शक्यता आहे.