तामिळनाडूत बसवर दगडफेक
तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांची प्रकृती पुन्हा ढासळल्याने त्यांच्यावर अपोलो रुग्णालयत उपचार सुरु आहेत.
नवी दिल्ली : तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांची प्रकृती पुन्हा ढासळल्याने त्यांच्यावर अपोलो रुग्णालयत उपचार सुरु आहेत.
जयललिता यांच्या प्रकृती ढासळल्यानंतर अपोलो रुग्णालयाबाहेर समर्थकांची रात्रीपासून मोठी गर्दी केलीये. रात्रभर समर्थकांच्या अम्मासाठी प्रार्थना सुरु आहे. सकाळी रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार जयललितांची प्रकृती चिंताजनक आहे. यामुळे अम्माच्या समर्थकांमध्ये चिंतेचे मोठे वातावरण पसरलेय.
यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून रुग्णालयाबाहेरील परिसरात पोलिसांचे मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. यातच सोमवारी सकाळी तामिळनाडूमध्ये दगडफेक झाल्याची घटना घडलीये. यामुळे तेथील बससेवा बंद करण्यात आलीये.