हॉल तिकीट नाही म्हणून विद्यार्थ्यांना परीक्षेपासून रोखता येणार नाही
केवळ परीक्षेचे ओळखपत्र नाही म्हणून विद्यार्थ्यांना परीक्षेपासून रोखता येणार नसल्याचा आदेश हरियाणाच्या हायकोर्टाने दिला आहे. ओळखपत्र हे शिस्त आणि पारदर्शकतेसाठी आवश्यक असले तरी केवळ परीक्षेचे ओळखपत्र बाळगले नाही म्हणून विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याच्या मुलभूत आधारापासून वंचित करता येणार नसल्याचेही कोर्टाने सांगितले.
हरियाणा : केवळ परीक्षेचे ओळखपत्र नाही म्हणून विद्यार्थ्यांना परीक्षेपासून रोखता येणार नसल्याचा आदेश हरियाणाच्या हायकोर्टाने दिला आहे. ओळखपत्र हे शिस्त आणि पारदर्शकतेसाठी आवश्यक असले तरी केवळ परीक्षेचे ओळखपत्र बाळगले नाही म्हणून विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याच्या मुलभूत आधारापासून वंचित करता येणार नसल्याचेही कोर्टाने सांगितले.
विद्यार्थ्याची ओळख पटेल असा कोणताही अन्य पुरावा ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरता येईल. रेवाडी इथल्या निधी राव यांनी याचिका केली होती. हॉल तिकीट हरवल्यामुळे निधी आधार कार्डची स्कॅन कॉपी घेऊन परीक्षेसाठी गेल्या होत्या. मात्र आधारच्या कॉपीला ग्राह्य धरण्यात आलं नव्हतं. तसेच निधी राव यांना परीक्षा देण्यापासून रोखण्यात आले. यांवर, परीक्षा केंद्राचे जबाबदार अधिकारी विद्यार्थ्याची ओळख पटवण्यासाठी अन्य पुरावे पाहू शकतात. यासाठी आधार तसेच अन्य ओळखपत्राचा पुरावा असल्यास ग्राह्य धरावे, असेही कोर्टाने सांगितले.