आरबीआय गव्हर्नर रघुराम राजन शिकागोला पाठवा : सुब्रमण्यम स्वामी
भाजपचे राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी आरबीआय गव्हर्नर रघुराम राजन यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्यामुळं भाजपची अडचण झालीय. राजन शिकागोला पाठवा, असं त्यांनी म्हटलंय.
नवी दिल्ली : भाजपचे राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी आरबीआय गव्हर्नर रघुराम राजन यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्यामुळं भाजपची अडचण झालीय. राजन शिकागोला पाठवा, असं त्यांनी म्हटलंय.
आरबीआयचे गव्हर्नर म्हणून रघुराम राजन हे योग्य नाहीत. त्यांच्यामुळं देशातल्या व्याजदरात मोठी वाढ वाढ झालीय. त्यामुळं त्यांना शिकागोला पाठवा असं वादग्रस्त वक्तव्य स्वामी यांनी केलंय.
पतमानांकनाचा धोका वाढल्यानं भारतात परदेशी बँका आपल्या शाखा सुरू करण्यास कचरतात, असं वक्तव्य राजन यांनी कँब्रिज विद्यापीठात दिलेल्या व्याख्यानात केलं होतं. त्यावर स्वामी यांनी टीकेची झोड उठवली.