नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने आणखी एक दे धक्का दिलाय. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीपाठोपाठ आता अनुदानित सिलिंडरच्या दरातही वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही वाढ 2 रुपयांनी करण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पेट्रोलच्या दरात लिटरला 3.38 रुपये तर डिझेलच्या दरात 2.67 रुपये वाढ बुधवारी करण्यात आली होती.आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव 13 टक्‍क्‍यांनी वाढल्याने तेल कंपन्यांनी हा दरवाढीचा निर्णय घेतला आहे.  दरम्यान, त्यापाठोपाठ अनुदानित सिलिंडरचे दरही वाढविण्यात आले आहेत.  


ग्राहकांना वर्षभरात अनुदानित 12 सिलिंडर मिळतात. मोदी सरकारच्या या निर्णयामुळे महागाईत सणाच्या काळात पुन्हा भडका उडण्याची शक्यता आहे.