दोन्ही सदनात नोटाबंदीवरून विरोधकांचा पुन्हा गोंधळ
लोकसभा आणि राज्यसभेत आज नोटाबंदीच्या मुद्द्यांवरून विरोधकांनी पुन्हा गोंधळ घातला. मोदींनी राज्यसभेत येऊन विरोधकांना उत्तर द्यावं या मागणीसाठी राज्यसभेत सलग पाचव्या दिवशी गोँधळ झाला. तर चर्चेनंतर मतदान घेण्याच्या मागणीसाठी लोकसभेत गोधळ बघायला मिळला.
नवी दिल्ली : लोकसभा आणि राज्यसभेत आज नोटाबंदीच्या मुद्द्यांवरून विरोधकांनी पुन्हा गोंधळ घातला. मोदींनी राज्यसभेत येऊन विरोधकांना उत्तर द्यावं या मागणीसाठी राज्यसभेत सलग पाचव्या दिवशी गोँधळ झाला. तर चर्चेनंतर मतदान घेण्याच्या मागणीसाठी लोकसभेत गोधळ बघायला मिळला.
दोन्ही सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आल्यानं गेल्या पाच दिवसांत जनहिताच्या एकाही मुद्द्यावर चर्चा झालेली नाही. संसदेचं कामकाज चालत नसल्याबद्दल अत्यंत दुःख होतंय. अशी प्रतिक्रिया लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी व्यक्त केलीय.