नवी दिल्ली : जळगाव घरकुल घोटाळ्याप्रकरणी माजी आमदार सुरेश जैन यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. या जामीनामुळे जळगावमधील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी डोकेदुखी अधिक वाढण्याची शक्यता असून त्यांना राजकारण जड जाण्याचे बोलले जात आहे.


10 मार्च 2013 ला सुरेश जैन यांना अटक करण्यात आली होती. जैन यांचा तब्बल अकराव्यांदा जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता. आता त्यांना जामीन मिळाला. त्यामुळे आगामी काळातल्या निवडणुकांमध्ये जळगावची स्थानीक राजकीय समीकरणांची जुळवाजुळव जैनांना थेट करता येणार आहे. जेलमधून सुटका झाल्याने राजकारणात त्यांचे महत्व अधिक वाढणार आहे.