चेन्नई : 'जलाईकट्टू' या खेळावरची बंदी कायम ठेवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिलेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तमिळनाडूत साजऱ्या होणाऱ्या पोंगल या सणाआधी जलाईकट्टू नावाचा खेळ खेळला जातो. मात्र या खेळावर 2014 मध्ये बंदी घालण्यात आली होती, ही बंदी उठवावी यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवरच्या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायलयानं ही बंदी उठविण्याबाबत लगेच निर्णय देण्यास नकार दिलाय. 


मात्र, यामुळे या खेळाचे चाहते समाधानी नाहीत. ही बंदी उठविण्यासाठी निदर्शन करण्यात आली. या निदर्शनांमध्ये डीएमकेच्या खासदार कनिमोळी याही सहभागी झाल्या होत्या.