नवी दिल्ली : गर्भ सुदृढ नसल्यामुळे गर्भपात करण्याची परवानगी मागणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं मान्य केली आहे. यासंदर्भात मुंबईतल्या एका महिलेनं आपल्या पतीच्या नावाने याचिका दाखल केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या महिलेचा गर्भ २१ आठवड्यांपेक्षा जास्त असल्यामुळे, कायद्याने तिला गर्भपात करता येत नव्हता. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या अनुमतीची आवश्यकता होती. 


गर्भाची वाढ योग्य प्रकारे होत नसल्याचा मुंबईतल्या डॉक्टरांचा अहवाल याचिकाकर्त्यांनी या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाला सादर केला होता.  त्यानुसार यासंदर्भातचा अहवाल तयार करून तो सर्वोच्च न्यायालयात सादर केला जाणार आहे. 


यापूर्वीही एका प्रकरणात गर्भाची वाढ योग्य होत नसल्याच्या कारणावरून सर्वोच्च न्ययालयानं गर्भपात करण्याची परवानगी दिली होती. मात्र, त्यासाठी डॉक्टरांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच सर्वोच्च न्यायालयानं तो आदेश दिला होता. त्यामुळे आजच्या सुनावणीकडे सा-यांचं लक्ष लागलं आहे.