नवी दिल्ली : रेल्वे तिकीटाच्या दरवाढीने सध्या सर्व प्रवाशी हैराण आहेत, रेल्वे दरवाढीचा फटका फार वर्षांनी बसल्याने प्रवाशांना हे नवीन आहे. मात्र सुरेभ प्रभू सध्या तिकीटांचे दर वाढविण्याच्या विरोधात आहेत. त्यापेक्षा रेल्वेला अन्य कोणत्या मार्गाने महसूल मिळवता येईल, यावर उपाय काढण्याचे आदेश त्यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रेल्वेच्या जास्त वर्दळ असलेल्या मार्गांवरील जनरल आणि स्लीपर कोचच्या प्रवासाची बसशी तुलना केल्यास दोन्हींच्या तिकीट दरांत खूप मोठी तफावत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. 


वाहतुकीच्या इतर साधनांपेक्षा रेल्वे प्रवासाचे दर खूपच कमी असल्याचे गाऱ्हाणे, रेल्वे अधिकाऱ्यांनी सुरेश प्रभूंसमोर मांडले आहेत. रेल्वे तिकिटांचे दर वाढविण्याचा प्रस्ताव अधिकाऱ्यांनी ठेवला आहे.


भारतीय रेल्वेला सध्या प्रवासी सेवेत तब्बल ३२ हजार कोटींची तोटा होत आहे. त्यामुळे रेल्वेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत असलेल्या तिकीट दरांमध्ये वाढ करण्याची आवश्यकता आहे. 


अधिकाऱ्यांच्या या वाढत्या दबावामुळे मे महिन्यातील निवडणुकांनंतर रेल्वेच्या तिकीट दरांत वाढ होण्याची शक्यता आहे. दिल्ली ते चंदीगढ या सर्वात कमी प्रवासी भाडे असणाऱ्या मार्गावरील तिकीटाचे दर दैनंदिन वापरातील टुथपेस्टपेक्षाही कमी आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.