मुंबई : इंदिरा गांधी या देशाच्या सर्वात शक्तिशाली पंतप्रधान असल्याचे प्रतिपाद केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केले. ते मंगळवारी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमेरिकेत आजपर्यंत एकही महिला राष्ट्रपती झालेली नाही. मात्र, भारतात राष्ट्रपती, लोकसभा अध्यक्ष आणि पंतप्रधान अशी तिन्ही प्रमुख पदं महिलांनी भुषवली आहेत, असे प्रभू यांनी सांगितले. 


जगभरातील अनेक महिलांनी आपल्या चांगल्या कामगिरीने पुरूषांसाठीचे मापदंड बदलायला भाग पाडलेत. भारतात तर महिलांनी आपल्या कार्यकौशल्याने एका संस्कृतीची उभारणी केली आहे, असे प्रभू म्हणालेत.