नवी दिल्ली : परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या प्रकृतीत सुधार होतांना दिसत आहे. त्यांना आज एम्स रुग्णालयातून डिस्चार्ज मिळू शकतो. १० डिसेंबरला त्यांच्यावर किडनी ट्रान्सप्लांट सर्जरी झाली होती. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधार झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एम्समध्ये एक विशेष डॉक्टरांनी टीम त्यांच्या प्रकृतीवर नजर ठेवून आहेत. त्यांना सोमवारी डिस्चार्ज मिळू शकतो अशी शक्यता आहे. सुषमा स्वराज यांची किडनी खराब झाली होती. किडनी ट्रांसप्लांट ही ५० मेडिकल स्टाफच्या टीमने केली.


सर्जरी ही ६ तास चालली आणि सशस्वी झाली. सुषमा स्वराज या खूप वेळेपासून डायबिटीजच्या पेशंट आहेत. किडनी फेल झाल्यानंतर त्यांनी एम्समध्ये भर्ती करण्यात आलं होतं. सुषमा स्वराज यांना ७ नोव्हेंबरला एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं.