नवी दिल्ली : ओल्गा इफिमनकोव्हा या रशियन तरुणीची तिच्या सासरच्या मंडळीच्या जाचातून सुटका करण्यात आली आहे. ओल्गाला तिची सासू हुंडा आणला नाही, म्हणून छळत होती. तिला आणि तिच्या तीन वर्षांच्या मुलीला घराबाहेर काढण्यात आलं होतं. तेव्हापासून ती घराबाहेर उपोषणाला बसली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ओल्गानं गोव्यात बीच रेस्टॉरंट चालवणा-या विक्रांतशी लग्न केलं होतं. पण विविध कारणांवरुन तिची सासू तिचा छळ करायची. यासंदर्भातल्या बातम्या पाहिल्यावर परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी ट्विट करुन त्या तरुणीला मदत करण्याची विनंती केली. अखिलेश यांनीही या प्रकरणात लक्ष घातलं आणि अखेर या तरुणीची सुटका झाली.