जैसलमेरमध्ये दिसलं संशयित ड्रोन, परिसरात खळबळ
राजस्थानमधील जैसलमेरमध्ये सोनार दुर्गवर ड्रोनने फोटो काढले गेल्याची माहिती येत आहे. पोलीस अधिक्षकांना याबाबत माहिती दिल्याचं समोर येतंय. जैसलमेरमध्ये ड्रोनवर बंदी आहे. ड्रोनने फोटो काढले देल्याने परिसरात खळबळ माजली आहे.
जैसलमेर : राजस्थानमधील जैसलमेरमध्ये सोनार दुर्गवर ड्रोनने फोटो काढले गेल्याची माहिती येत आहे. पोलीस अधिक्षकांना याबाबत माहिती दिल्याचं समोर येतंय. जैसलमेरमध्ये ड्रोनवर बंदी आहे. ड्रोनने फोटो काढले देल्याने परिसरात खळबळ माजली आहे.
पोलिसांनी हे प्रकरण गंभीरपणे घेतलं आहे आणि याची चौकशी सुरु केली आहे. ज्या गाडीतून हे संशयित आले होते त्या गाडीवर गुजरातचा नंबर होता. पोलीस या गाडीचा शोध घेत आहेत.
GJ.5JA 2941 आणि GJ.15cb 686 या नंबरच्या वाहनांचा पोलीस शोध घेत आहेत. सोनार दुर्गवर जवळपास २०० फूटवर हे ड्रोन उडत होतं. ड्रोनमध्ये लागलेल्या कॅमेऱ्यामध्ये वाइड अँगल लेंसने फोटो काढल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. हवाईदलाचं तळ याच ठिकाणी आहे त्यामुळे त्याचे फोटो ही काढले गेल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. स्थानिक फोटोग्राफरने हे संशयित ड्रोन पाहिलं आणि त्य़ाची माहिती दिली. शुक्रवारी राजनाथ सिंह हे जैसलमेरला जाणार आहेत.