झालावाड :  राजस्थानच्या झालावाड जिल्ह्यात शनिवारी होणाऱ्या एका लग्नाची पत्रिका सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या कार्डावर श्लोक किंवा शुभाशिर्वाद ऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत मिशनच्या घोषणा छापल्या आहेत. त्या पण एक नाही पाच घोषणा देण्यात आल्या आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही कल्पना नवरदेवाचे काका रामविलास मीना यांची आहे.  रामविलास हे ग्रामपंचायतीचे प्रचार आणि स्वच्छता अधिकार आहेत. रामविलास यांच्या पुतण्याची २९ एप्रिल रोजी लग्न आहे. त्यांनी बाल-विवाह बंदी आणि पंतप्रधानाच्या स्वच्छता अभियानाचा संदेश छापला आहे. 


या लग्न पत्रिकेच्या माध्यमातून घराघऱात शौचालय बनविण्याचे आवाहन केले आहे.