नवी दिल्ली : नोटाबंदीच्या निर्णयानंतर अर्थव्यवस्थेच्या प्रगतीचा दर मोठ्या प्रमाणात घसरणार नाही असा विश्वास आज अर्थमंत्री अरुण जेटलींनी व्यक्त केलाय.  प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करांच्या उत्पन्नात डिसेंबर ते एप्रिल या कालावधीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं जेटलींनी आज स्पष्ट केलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एप्रिल ते डिसेंबर याकाळात प्रत्यक्ष करांचं उत्पन्न 12.01 टक्के तर अप्रत्यक्ष करांचं उत्पन्न गेल्यावर्षीच्या तुलनते तब्बल 25 टक्के वाढल्याचं जेटलींनी म्हटलं. या नऊ महिन्यांच्या काळात अबकारी करात 43 टक्के तर सेवाकरात 23.9 टक्के वाढ झाल्याचं जेटली यांनी स्पष्ट केलं. नोटाबंदीच्या निर्णयानंतर म्हणजेच डिसेंबर महिन्यात अप्रत्यक्ष करांचं उत्पन्न गेल्यावर्षीच्या तुलनेत तब्बल 14.2 टक्के वाढलंय.