धनबाद : झारखंडमधील १० वर्षाचा मुलगा ६ वर्षापासून श्वानाचं दूध पितोय. मोहित कुमार आता १० वर्षाचा आहे, पण  ४ वर्षांचा होता, तेव्हापासून तो  श्वानाचे दूध पितोय. त्याला श्वानाचे दुध पिण्याची सवय लागली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्वानाचे दूध पिऊनच त्याची वाढ झाली आहे, असे त्याच्या पालकांनी सांगितले. या मुलाला धनबाद परिसरात मोगली म्हणतात.


मोहितच्या आईवडिलांनी मोहितची ही सवय मोडण्यासाठी खूप प्रयत्न केले पण त्यांना अपयश येत आहे. मोहितची आई पिंकी कुमारी यांनी सांगितले, 'मोहित ४वर्षांचा असताना घराबाहेर खेळत होता. एक दिवस अचानक तो श्वानाचे दूध पित असताना आढळून आला. त्यावेळी त्याला दूर करण्यात आले'. 


मात्र, श्वानही त्याच्यापासून दूर जात नव्हते. श्वानाजवळ जाऊ न दिल्यास तो मोठा गोंधळ घालत असे. मोहितला श्वानाचे दूध पिण्याची सवयच लागली होती. गेल्या ६ वर्षांपासून तो न चुकता श्वानाचे दूध पित आहे.'


एकदा श्वानाने त्याचा चावा घेतला. उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मोहितच्या घरची आर्थिक परिस्थिती गरीबीची आहे. घराबाहेर पडल्यानंतर तो श्वानाचे दूध पितो, म्हणून त्याच्यावर सतत लक्ष ठेवले जात होते. शाळेत जात असतानाही त्याच्यासोबत सतत कोणीतरी असतं.


 'श्वानाचे दूध हे मानवी शरीराला घातक आहे. पण, मोहित अनेक वर्षे पित असून, हे धोकादायक आहे. यापासून त्याला परावर्तीत करणे आवश्यक आहे', असे पाटलीपुत्र वैद्यकीय महाविद्यालयाचे वरिष्ठ डॉक्टर डी. के. सिंग यांनी म्हटले आहे.