दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक, एक दहशतवादी ठार
जम्मू-कश्मीरमधील बारामूला जिल्ह्यामध्ये मंगळवारी सकाळी दहशतवादी आणि जवानांमध्ये झालेल्या चकमकीत एक दहशदवादी ठार झाला आहे. जवान आणि दहशतवाद्यांमध्ये अजूनही चकमक सुरु असल्याचं बोललं जातंय.
जम्मू : जम्मू-कश्मीरमधील बारामूला जिल्ह्यामध्ये मंगळवारी सकाळी दहशतवादी आणि जवानांमध्ये झालेल्या चकमकीत एक दहशदवादी ठार झाला आहे. जवान आणि दहशतवाद्यांमध्ये अजूनही चकमक सुरु असल्याचं बोललं जातंय.
मारल्या गेलेल्या दहवशतवाद्याकडून हत्यारं हस्तगत करण्यात आली आहेत. लष्कराला बारामूलामधील हरितार तारजू भागात २ दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर जवानांनी सर्च ऑफरेशन सुरु केलं. यादरम्यान एक दहवशतवाद्याला ठार करण्यात जवानांना यश आलं आहे.