जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीत २ अतिरेक्यांना कंठस्नान
जम्मू-काश्मीरमध्ये अतिरेक्यांनी पोलिसांच्या गस्तीपथकावर हल्ला केला आहे. यावेळी दोन्ही बाजून गोळीबार झाला
जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरमध्ये अतिरेक्यांनी पोलिसांच्या गस्तीपथकावर हल्ला केला आहे. यावेळी दोन्ही बाजून गोळीबार झाला. या चकमकीत दोन अतिरेक्यांनी कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश आलं आहे. मारल्या गेलेल्या अतिरेक्यांकडून एक एसएलआर आणि एक एके-४७ जप्त करण्यात आली आहे.
पुढच्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वात मोठ्या बोगद्याचे उद्घाटन करण्यासाठी जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर जाणार आहेत. पंतप्रधानांच्या आगमनापूर्वी अतिरेकी हल्ला झाल्याने सुरक्षेत आणखी वाढ करण्यात आलीय. गेल्या २४ तासात हा दुसरा हल्ला आहे.