संसद भवन आणि महत्त्वाच्या इमारतींची सुरक्षा वाढवली
एलओसीमध्ये भारतीय लष्कराने केलेलं सर्जिकल स्ट्राईक पाकिस्तानला चांगलाच जिव्हारी लागलंय. पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांना देखील याचा चांगलाच धस्का बसला आहे. यानंतर पाकिस्तानातील दहशतवादी संघटना भारतात हल्ले करण्याच्या तयारीत असल्याचं अनेकदा समोर येत आहे. भारतातील सुरक्षा यंत्रणा आणि लष्कराने यानंतर कंबर कसली आहे.
नवी दिल्ली : एलओसीमध्ये भारतीय लष्कराने केलेलं सर्जिकल स्ट्राईक पाकिस्तानला चांगलाच जिव्हारी लागलंय. पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांना देखील याचा चांगलाच धस्का बसला आहे. यानंतर पाकिस्तानातील दहशतवादी संघटना भारतात हल्ले करण्याच्या तयारीत असल्याचं अनेकदा समोर येत आहे. भारतातील सुरक्षा यंत्रणा आणि लष्कराने यानंतर कंबर कसली आहे.
संसद भवन आणि दिल्लीतील इतर महत्त्वाच्या इमारतींची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. संसदेच्या जवळच्या कनाट प्लेस मार्केटमध्ये ही सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सुरक्षा तज्ज्ञांच्या मते, आतापर्यंत जीही गुप्त माहिती आणि पुरावे मिळाले आहेत ते पाकिस्तान समोर ठेवण्यात आले आहे. तरी देखील जर दिल्लीत किंवा भारतात कुठे हल्ले झाले तर त्याला चोख प्रत्त्यूतर दिलं जाईल.
सकाळपासून अनेकदा दहशतवादी हल्ल्याची आणि घुसखोरीची माहिती लष्कराला आणि गुप्तचर संघटनांना मिळाली आहे. पाकिस्तानातून दहशतवादी वारंवार भारतात घुसखोरीचा प्रयत्न करत आहे. भारतात आणि खास करुन दिल्लीत काही महत्त्वाच्या ठिकाणी दहशतवादी हल्ल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.