नवी दिल्ली : भारत-पाकिस्तान सीमेवर तणाव वाढत आहे. समुद्रमार्गे दहशतवादी भारतात घुसखोरीचा प्रयत्न करु शकतात. सूत्रांच्या माहितीनुसार पाकिस्तानातील दहशतवादी सोमनाथ आणि द्वारका येथे हल्ल्याचा कट रचत आहे. हाय अलर्ट नंतर सीमाभागावर सुरक्षा मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनुसार कराचीमधून एक बोट गुजरातमध्ये पकडण्यात आली होती. कराची येथून एक बोट ही द्वारका येथे घुसखोरीच्या उद्देशाने निघाली असल्याचं बोललं जातंय. यानंतर गुजरातमध्ये हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. 


पोलीस अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. IPS अधिकाऱ्यांना हेडक्वॉर्टरला रिपोर्ट करण्यास सांगण्यात आलं आहे. समुद्र किनाऱ्यावर आणि सोमनाथ मंदिराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. द्वारका आणि सोमनाथ मंदिर हे दहशतवाद्यांच्या निशान्यावर असल्याची माहिती मिळाली आहे.


सोमनाथ मंदिर येथे दहशतवादी कराचीहून सहज पोहचू शकतात कारण यामधील अंतर कमी आहे. मुंबई हल्ल्यावेळेही दहशतवादी कराचीच्या याच बंदरातून भारतात येण्यासाठी निघाले होते. बस स्टॉप, रेल्वे स्टेशन आणि एअरपोर्टची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. जवान आणि पोलिसांना हायअलर्टचा आदेश देण्यात आला आहे.