पाकिस्तानी लष्कराच्या गणवेशात दिसले दहशतवादी, हल्ल्याच्या तयारीत
गुप्तचर विभागाने एक मोठा खुलासा केला आहे. आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तान सेनेच्या कपड्यांमध्ये काही दहशतवादी दिसल्याचं गुप्तचर विभागाला माहिती मिळाली आहे. पाकिस्तानातील दहशतवाद्यांना गुरु लश्कर कमांडर साजिद जट उर्फ नोमी हा भारतात मोठे हल्ले करण्याचे आदेश देत आहे.
नवी दिल्ली : गुप्तचर विभागाने एक मोठा खुलासा केला आहे. आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तान सेनेच्या कपड्यांमध्ये काही दहशतवादी दिसल्याचं गुप्तचर विभागाला माहिती मिळाली आहे. पाकिस्तानातील दहशतवाद्यांना गुरु लश्कर कमांडर साजिद जट उर्फ नोमी हा भारतात मोठे हल्ले करण्याचे आदेश देत आहे.
नोमीचे कॉल डिटेल्समध्ये हा मोठा खुलासा झाला आहे. नोमी 26/11 हल्ल्यातील मास्टरमाइंड हाफिज सईदचा जवळचा मानला जातो. काश्मीर खोऱ्यात अबू दुजाना हा सर्वात मोठ्या दहशतवादी ग्रुपला सध्या लीड करत असल्याचं देखील समोर आलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार दुजानाने कश्मीरमध्ये हल्ल्याची योजना तयार केली आहे. तीन जागेवर दहशतवादी हल्ल्याची योजना आखली गेली आहे. ज्यासाठी तीन ग्रुप बनवले गेले आहेत. एका ग्रुपला एक महिला लीड करत असल्याचं देखील समोर आलं आहे.
पाकिस्तानातून या दहशतवाद्यांना सूचना मिळत आहेत. अबू उसामा आणि हम्माद हे दोघं २ ग्रुपला लीड करत आहेत. सर्जिकल स्ट्राइकनंतर KARWAYI हा कोड नेम वापरुन दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत आहे.