श्रीनगर : जम्मू-कश्मीरमधील नौगाम सेक्टरमधून आताची मोठी बातमी समोर आली आहे की, पुन्हा एकदा दहशतवाद्यांकडून भारतीय सीमेतून घुसखोरीचा प्रयत्न झाला आहे. घुसखोरी करणाऱ्या एका दहशतवाद्याला जवानांनी कंठस्नान घातलं असून सर्च ऑपरेशन सुरु आहे.


मारल्या गेलेल्या एका दहशतवाद्याचा मृतदेह हा जवानांनी ताब्यात घेतला असून इतर दहशतवाद्यांचा शोध सुरु आहे. परिसरात जवानांनी शोध कार्य सुरु केलं आहे.