अहमदाबाद : उरी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या मदतीसाठी लंडनमध्ये राहणारी नीती राव पुढे आली आहे. नीतीने तिचा पगार आणि इतर खर्च वाचवत ती मदत उडी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानाच्या मुलांना देण्याची इच्छा वर्तवली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नीतीने म्हटलं की, शहिदांच्या मुलांच्या मदतीसाठी मदद ती दरवर्षी २५ हजार रुपये देणार आहे. जर कोणता मुलगा लंडनमध्ये शिकणार असेल तर ती त्यांच्या शिक्षणाच्या खर्चाची जबाबदारी घेण्यासही तयार आहे. नीती लंडन यूनिवर्सिटीमध्ये साहित्य या विषयात रिसर्च करतेय. तिचं कुटुंब १२ वर्षांपासून लंडनमध्येच राहतं. तिचे वडील एका कंपनीत काम करतात आणि सध्या ती सुट्टींमध्ये भारतात आली आहे. 


शहीदांच्या मुलांना मदत करण्याची तिची इच्छा आहे. नीतीने म्हटलं की, तिला काही दिवसांपूर्वीच एका संस्थेने ५ लाख रुपये पुरस्कारच्या स्वरुपात दिले आहे. जे ती उरी हल्ल्यातील शहीदांच्या मुलांना देणार आहे. जेव्हा नीतीने उरी हल्ल्याची माहिती ऐकली तेव्हा पासून ती खूप व्यथीत होती असं तिने म्हटलं आहे.


नीतीची ही कामगिरी आणि तिची मदत करण्याची इच्छा ही नक्कीच कौतूकास्पद आहे.