गुहाहटी : निसर्गात काय घडले हे कोणीही सांगू शकत नाही. अनेक आश्चर्यकारक घटना घडत असतात. यात आणखी एका घटनेची भर पडली आहे. आजही अनेक गोष्टी आपल्याचा अंचबित करतात. आसामधील बकरीकडे पाहून तुम्हाला नक्कीच जगातील आठवे आश्चर्य पाहात असल्याची जाणीव होईल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आसाममध्ये एक डोळा असणाऱ्या बकरीने जन्म घेतला आहे. या एका डोळ्याच्या बकरीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या बकरीला पाहण्यासाठी लोक गर्दी करु लागले आहेत.


आसाममधील मुखरी दास यांच्या घरात या बकरीने जन्म घेतलाय. या बकरीला एक डोळा असला तरीही ती बकरीप्रमाणे हिंडू फिरू शकत आहे. या बकरीला पाहण्यासाठी मुखरी दास यांच्या घरी लोकांची रिघ लागत आहे.