कोझिकोड : आयुष्‍यात मैत्री कधीही कोणाशीही होऊ शकते. मै‍‍त्रीच नात हे हृदयासी जोडलेल एक नितळ नात आहे. केवळ दोन व्यक्तीच एकमेकांचे चांगले मित्र होऊ शकतात असे नाही. याचेच एक उदाहरण केरळमध्ये समोर आलेय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

३८ वर्षीय नवीनने कोझिकोड ते शबरीमाला असा ६०० किमीचा प्रवास चालत केला. मात्र या प्रवासादरम्यान त्याची एका कुत्रीशी मैत्री झाली. मालू असे या कुत्रीचे नाव. यांच्या मैत्रीची कथा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतेय.


न्यूज मिनिटच्या रिपोर्टनुसार, आठ डिसेंबरला नवीनला मालू भेटली. जेव्हा त्याने शबरीमालाच्या दिशेने प्रवास सुरु केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याला मलू भेटली. सुरुवातीला नवीनला वाटले गावाच्या हद्दीपर्यंत ही मागेमागे येईल. मात्र त्यानंतरही मलूने नवीनची साथ सोडली नाही. नवीनने तिला खायला दिले. पाणी दिले. तेथूनच त्यांच्यातील मैत्रीची सुरुवात झाली. मात्र त्या दिवसानंतर मलूने नवीनची साथ सोडली नाही. संपूर्ण प्रवासादरम्यान मलू त्याच्यासोबत होती.


त्यांच्यातील मैत्री इतकी घट्ट होत गेली की अखेर नवीनने मलूला त्याच्या घरी घेऊन जाण्याचे ठरवले. चक्क ४६० रुपयांचे तिकीट काढून नवीनने मालूला बसने आपल्या घरी आणले. मालू आता नवीनच्या घरी राहते.