त्रिपुरा : संसद आणि विधीमंडळातला लोकप्रतिनिधींचा राडा तसा जनतेला नवा नाही. त्रिपुरा विधानसभेत असंच अशोभनीय वर्तन करत आमदारांची सभागृहाच्या प्रतिष्ठेची शोभा केली आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून खडाजंगी सुरू होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वनमंत्र्यांवरील आरोपांवर चर्चा सुरू असताना अचानक तृणमुल काँग्रेसच्या आमदारानं थेट वेलमध्ये जाऊन घोषणाबाजी सुरू केली. एवढ्यावर त्याचं मन भरलं नाही....त्यामुळं सुदीप रॉय बर्मन यांनी विधानसभा अध्यक्षांच्या आसनासमोर ठेवलेला राजदंड घेऊन पळ काढला.


सभागृहात मोठा गोंधळ उडाला. आजूबाजूचे आमदारही त्यांच्या मागे धावत सुटले. मार्शलही राजदंड घेण्यासाठी रॉय यांच्यामागे धावले. अखेर रॉय़ यांनीच लॉबितल्या कर्मचा-यांच्या हातात राजदंड देत गोंधळला पूर्णविराम दिला. यामुळं मात्र देशभरात त्रिपुरा विधानसभेची शोभा झाली. पुन्हा एकदा जनतेला लोकप्रतिनिधींच्या बेजबाबदार वागणुकीचा प्रत्यय आला. 


पाहा व्हिडिओ