आणखी एका खासदाराचा एअर इंडियाच्या विमानात गोंधळ
एअर इंडिया आणि शिवसेना खासदार रविंद्र गायकवाड यांच्यातील वाद काही तांसापूर्वीच संपला असला तरी आता आणखी एका खासदाराचा वाद निर्माण झाला आहे. तृणमूल काँग्रेसच्या राज्यसभेतील खासदार डोला सेन यांनी दिल्लीहून कोलकाताला जाणारं एअर इंडियाचं विमान अर्धातास रोखून धरलं. खासदारांनी सुरक्षेच्या प्रोटोकॉलचं पालन करण्यासही नकार दिला. खासदार डोला सेन यांनी विमानात गोंधळ देखील घातल्याचं बोललं जातंय.
नवी दिल्ली : एअर इंडिया आणि शिवसेना खासदार रविंद्र गायकवाड यांच्यातील वाद काही तांसापूर्वीच संपला असला तरी आता आणखी एका खासदाराचा वाद निर्माण झाला आहे. तृणमूल काँग्रेसच्या राज्यसभेतील खासदार डोला सेन यांनी दिल्लीहून कोलकाताला जाणारं एअर इंडियाचं विमान अर्धातास रोखून धरलं. खासदारांनी सुरक्षेच्या प्रोटोकॉलचं पालन करण्यासही नकार दिला. खासदार डोला सेन यांनी विमानात गोंधळ देखील घातल्याचं बोललं जातंय.
एअर इंडियाने आजच शिवसेना खासदार रविंद्र गायकवाड यांच्यावरील बंदी हटवली आहे. गायकवाड यांनी माफीचं पत्र दिल्यानंतर एअर इंडियाने त्यांच्यावरील बंदी हटवली आहे.