अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 500 आणि 1000च्या नोटांवर बंदी घातल्याचे जाहीर केल्यानंतर गुजरात औद्योगिक विकास प्राधिकरणमधील अनेक कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना पुढील काही महिन्यांचा आगाऊ पगार दिलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही कंपन्यांनी तर कर्मचाऱ्यांना पुढील सहा महिन्यांचा पगार आगाऊ दिलाय. नगीन बारिया या जीआयडीसीमधील एका कंपनीत ऑफिस पिऊन म्हणून काम करतात. त्यांना दरमहा 4 हजार रुपये पगार आहे. त्यांच्या कंपनीने त्यांना तब्बल 24हजार रुपये दिलेत. पुढील सहा महिन्यांचा पगार त्यांना आधीच देण्यात आलाय. या पगारात त्यांना 500 आणि 1000च्या नोटा देण्यात आल्यात.


500 आणि 1000च्या नोटा संपवण्यासाठी कंपनीने हा निर्णय़ घेतलाय. याबाबत बोलताना बारिया म्हणाले, कंपनीने पुढील सहा महिन्यांचा पगार आम्हाला आधीच दिलाय. त्यामुळे पुढचे सहा महिने आमच्या हातात कोणताही पैसा येणार नसल्याने पैशाचा काळजीपूर्वक वापर केला पाहिजे. बारियांप्रमाणेच राजेश परमार हे एका फर्ममध्ये ऑफिस असिस्टंट म्हणून काम करतात त्यांनाही मार्च 2017पर्यंतचा पगार देण्यात आलाय.