नवी दिल्ली : पाचशे आणि हजारच्या जुन्या नोटा बँकेत भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उद्यापासून या जुन्या नोटा बँकेत जमा करता येणार नाहीत. त्यानंतरही तुमच्याकडे हजार आणि पाचशेच्या नोटा असतील तर त्या 31 मार्चपर्यंत रिझर्व बँकेत जमा कराव्या लागणार आहेत.


त्यानंतर मात्र तुमच्याकडे पाचशे किंवा हजारच्या जुन्या नोटा सापडल्या तर कारवाईला सामोरं जावं लागणार आहे. 


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ८ नोव्हेंबरला नोटाबंदीची घोषणा केली होती. या घोषणेला ५० दिवस उलटून गेले असले तरी अद्याप नोटांची टंचाई देशभर जाणवतेय.