पणजी : गोव्यामध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेस आणि भाजपमध्ये चुरस सुरु आहे. नितीन गडकरी आणि दिग्विजय सिंग हे गोव्यामध्ये पोहोचले आहेत. इतर आमदारांशी भाजपची बोलणी सुरु झाली आहेत.


गोव्यामध्ये ४० जागांपैकी काँग्रेसला १७, भाजपला १३, मगोपला ३, गोवा फॉरवर्ड ब्लॉकला ३ आणि अपक्षांना ३ जागा मिळाल्या आहेत. बहुमताचा आकडा कोणालाच गाठता आला नसल्यामुळे आता इतर पक्षांवरच गोव्यात कोणाचं राज्य येणार हे अवलंबून आहे.