नवी दिल्ली : सरकारने नोटांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्यानंतर लोकांच्या बँकांसमोर तसेच एटीएमसमोर मोठमोठ्या रांगा लागल्यायत.  राजधानी दिल्लीतही लोकांच्या बँक तसेच एटीएमसमोर मोठमोठ्या रांगा लागल्या होत्या. मात्र त्यादरम्यान जे काही घडले ते पाहून तेथील लोक चांगेलच हैराण झाले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मीडिया रिपोर्टनुसार, रांगेत उभे राहून कंटाळलेल्या एका तृतीयपंथी व्यक्तीने राग व्यक्त कऱण्यासाठी चक्क भररस्त्यात आपले कपडे उतरवल्याची घटना दिल्लीतल्या मयूर विहार फेस3च्या एटीएमच्या बाहेर घडलीये. या ठिकाणी एटीएमच्या बाहेर लोकांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. यादरम्यान रांगेत उभे राहून कंटाळलेल्या तृतीयपंथीयानं रागाने चक्क आपले कपडे उतरवले. हे पाहून तेथील उपस्थित लोक चांगलेच चक्रावले. यादरम्यान महिला पोलिसांनी तात्काळ तेथे धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. 


नोटाबंदीनंतर 10 नोव्हेंबरपासून बँकांमध्ये नोटा बदलून मिळतत आहे. तसेच 11 नोव्हेंबरपासून एटीएममधूनही नव्या नोटा काढण्याची प्रक्रिया सुरु झालीये. तेव्हापासून बँक तसचे एटीएमबाहेर लोकांची मोठी गर्दी दिसतेय.